अशी असावी कविता
अशी असावी कविता
शब्दांमधून मिळावी, स्फूर्ती छान
कवितेतून घडावी, उत्क्रांती महान
अशी असावी कविता आपली
मांडणी असावी, सुख दुःखातली//१//
बोध मिळावा कवितेतून साऱ्यांना
मानसिक समाधान मिळावे इतरांना
कविता असावी सदा उबदार
कविता असावी नेहमी रुबाबदार//२//
कविता अशी मनावर ठसावी
कविता सदा आपली भासावी
शब्द वापरावे जरा जपून
वाद उठणार नाही कुणाकडून//३//
कवितेच्या जगात करावी भटकंती
ज्याने मिळेल मनाला शांती
अशी असावी, कवितेची झलक
जिकडे तिकडे, कवितेचेच फलक/४/
ऊन पाऊस गार वारा
कवितेत शोभावा, मोर पिसारा
भिजणाऱ्या वाटा, नाचणाऱ्या लाटा
कवितेत असाव्या, सुंदर छटा//५//
कवितेच्या विश्वात, रमावे सगळे
त्यासाठी हवे, शब्द वेगळे
कवितेतून व्यक्त, चांगले विचार
बदलावे साऱ्यांचे, आचार विचार//६//
