STORYMIRROR

kusum chaudhary

Others

4  

kusum chaudhary

Others

असे यावे नववर्ष

असे यावे नववर्ष

1 min
489

असे यावे नववर्ष आता

नवे स्वप्न नव्या आकांक्षा

पूर्ण व्हाव्या सर्व इच्छा

नसावी मनात अपेक्षा


भय सरावे हे कोरोनाचे

मुक्त स्वच्छंदी विहरावे.

निरामय आरोग्य लाभो

सर्वांना दु:खच नसावे.


जातीभेद व्हावा नष्ट

नसावा कुठे भेदभाव

खरो तो एकच धर्म

जगी प्रेम असावे ठाव.


फिटावे दु:खाचे जाळे

पसरावा सुखाचा प्रकाश.

दरी खो-यात गावात

वाहू दे सुखच झकास.


सुख समृध्दी आनंदाने

करू नववर्षाचे स्वागत.

कष्ट परिश्रमाने करू

दु:ख दारिद्र्यावर मात.


Rate this content
Log in