असे वाटते...
असे वाटते...


असे वाटे, प्रेम सागरात एकदा डुंबुनि जावे
प्रेमिक होऊन प्रेमसागराचा आस्वाद घेऊन यावे
जिंकून जावे स्वतःच्या नादात असे वाटे,
झोकुन द्यावे स्वतःच्या पाशात
पण नंतर कळते, यासाठी आपली लायकी नाही
असे वाटे, प्रेमात पडायला नको नुसतीच स्वप्न भरारी
म्हणूनच नको वाटतात या लाटा अन् लहरी
असे वाटे, किनाऱ्यावरची सावली देणारी झाडेच बरी
बसेन घरी किनाऱ्यावरी इतरांप्रमाणे तरी नाही
खरे टाकणार, त्या सागरात डुंबणाऱ्या प्रेमिकांवरी
असे वाटे, की फुलपाखरासारखे
अवकाशात उंच उंच स्वप्नांची भरारी घ्यावी...