STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Others

3  

shubham gawade Jadhav

Others

असे शब्द असावेत

असे शब्द असावेत

1 min
342

मांसाचा नाही तर काळजाचा

वेध घेणारे असावेत


पानावरच्या शब्दांना वाचा फुटावी

असे शब्द असावेत


असत्याची कास धरणारे नाही तर सत्याला

वाचा फोडणारे असावेत


काळ्या कुट्ट पाषाणालाही

घाम फोडणारे असावेत


ओल्या चिखलासारखे गळून पडणारे नाही तर

ओल्यामध्ये वनवा पेटवणारे असावेत


शब्द हे अन्यायाला वाचा

फोडणारे असावेत


काळाला घाबरून शेपूट घालणारे नाही तर

काळाचा थरकाप उडवणारे असावेत


शब्द हे अचूक वेध

घेणारे असावेत


कोणाची चमचेगिरी करणारे नाही तर

सत्याची गरळ ओकणारे असावेत


शब्द हे वर्मी

घाव घालणारे असावेत


आगीत तेल ओतणारे नाही तर

जळत्या ज्वालांना क्षमवणारे असावेत


शब्द हे जोडणारे

असावेत


Rate this content
Log in