अर्पितो फुले
अर्पितो फुले
1 min
221
कनकरंगी मृदुलांगी
सोनचाफा बरा
मधुरगंध प्रिय बहू
असे तो उमावरा
तेजोमयी लालबुंद
प्रमुदित जास्वंद
दुर्वांकुर तोषवी,
गजानना मोरेश्वरा
माळी गजरा कुंतली
मोगऱ्याचा अंबिका
शेवंती अबोलीचा
शोभतो शिरी तुरा
हिरवी वैजयंती माळ
विठुरायाच्या गळी
शोभते करी कमळ
कौस्तुभ विष्णूच्या गळी
