अर्जुन..!
अर्जुन..!
शालू हिरवा, तो भरजरी
विविधतेची, नक्षी त्यावरी...!
खाली सागर, पाय पुसतो
वरी डोंगर, छत्र धरितो....!
नागा पंजाब, राजपूत ते
तुझ्या रक्षणा, शस्त्र पुजिते...!
त्याग करूनी, तो संसाराशी
स्वातंत्र्यवीर, चढले फाशी....!
किती निर्मिले, थोर सबल
ज्यांनी अर्पिलें, शिरकमल...!
मी ही घेतली, तीच बिदागी
करी कपट, तोच अभागी...!
शुर शिवाजी, मराठी बाणा
निधडी छाती, मी महाराणा...!
मंगल पांडे, चाफेकर हीं
फोडीन डोकी, हे निःसंदेही....!
बालपणी तो, सूर्य गिळला
लंकासुराचा, गर्व हरिला...!
भरे धडकी, तव शत्रूला
निघें अर्जुन, बघ युध्दाला...!
विजयी होई, चिंता न करी
विररत्नांची, खाण उदरी...!
हा मळवट, लाल भरतो
शस्त्र आघाते, रक्त सांडतो...!
पुन्हा न कोणी, करी वल्गना
शत्रू निःपात, हीच दक्षिणा...!
भरेल ओटी, मी विजयाने
किंवा गर्व तो, वीरमरणे..!
