अरे संसार संसार
अरे संसार संसार
1 min
263
सकाळी उठून करायचा कालचाच रगाडा
पाणी भरा, भांडी धुवा, चहा नाश्त्याच्या गाडा
स्वयंपाक करा, डबे भरा, लवकर बाहेर पडा
नोकरीची वेळ साधायला हवी , चला धडाधडा
कधी उगवतो दिवस व कधी मावळतो
केव्हा सूर्य येतो आणि केव्हा चंद्र दिसतो
नोकरी करणाऱ्या स्त्रियांना वेळच नसतो
सांगड घालताना कसरतीचा खेळच होतो
पहाटेच काम संपवून थोड्या करतात पायपीट
तरच त्यांचा दोन चाकांचा गाडा चालतो नीट
चिल्लीपिल्ली असल्यास रात्रीचेच काजळ तीट
संसाराचा डोलारा सांभाळताना व्हावे लागते धीट
