STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Others

4  

Prof. Dr.Sadhana Nikam

Others

अरे पावसा पावसा

अरे पावसा पावसा

1 min
41.9K


अरे पावसा पावसा

तुझ अवचित येणं

तुझ्याविना झालं

सार जग सुनं सुनं

बरसशील जेव्हा

तेव्हा रूप देखणं

नक्षत्रांच तारांगण

तुझ मेघांशी बंधन

सप्तरंगी इंद्रधनुच

रुपेरी अंगण

पुरे कर आता

लपाछपी खेळणं

ऊन सावलीनं

गगनाच अंधारनं

जीव झाला कासावीस

तुझ नेहमीचच रुसणं

तुझ्याविना नाही

सृष्टीच सजणं

हिरव्या वनराईच

कधी होईल नटणं

कडे कपारीतून

तुझ चंचल धावणं

झोंझावनाऱ्या वाऱ्याशी

संगत करणं

नको दावूस भीती

तुझं अवसान उसणं

लपत छपत

अस कस तुझ येणं

अरे पावसा पावसा

तुझ न्यारच वागणं

तुझ न्यारच वागणं.


Rate this content
Log in