STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

अरे चांदव्या

अरे चांदव्या

1 min
719

निलाजरे हे कवडसे घेती शय्येवरती उड्या

अरे चांदव्या किती सतावी, किती करी कुरघोड्या....!!ध्रुव !! 


सजले रायासाठी,जशी वाटे तुझी रुप चांदणी

मन मोहिनी, तुझी साजनी नार मी बहु देखणी

परत फिर चांदव्या ,वाट चुकलास आज वेड्या

अरे चांदव्या किती सतावी किती करी करीकुरघोड्या... !!१ !!


 तुझ्या प्रणयलीलांनी शहारेल गोरे अंग-अंग

 लाडात येऊन बिलगशील भरू प्रणयी रंग

घेतले घट्ट मिटून नयन पाहून तुझ्या खोड्या 

 अरे चांदव्या किती सतावी किती करी कुरघोड्या....!!२!!


ओठ घेऊन ओठात गुलाबी चुंबलेस कितीदा

तृप्ती होऊन तुझी मिळाली रसाची सुखसंपदा 

अवखळ नाठाळ सख्या शिणवितो मज तू वेड्या

अरे चांदव्या किती सतावी किती करी कुरघोड्या...!!३!!


राशी सुखाधिनतेच्या या लुटतोस भरभरून

बिछान्यावरी टाकते गुलाबकळ्या या पसरून 

प्रणयोत्सुक मोहना तू विस्कटशील का रे थोड्या

अरे चांदव्या किती सतावी किती करी कुरघोड्या...!!४!!


Rate this content
Log in