अर्धमेला
अर्धमेला
1 min
30
अर्धमेला झाला माणूस
या वायरसच्या धक्याने ।।ध्रु ।।
रोकड संपली, शिल्लक संपली
काम ही गेले समस्येने.
करे निभाऊँ तोंडे दहा
खर्चही वाढला आकड्याने
अर्धमेला झाला माणूस
या वायरसच्या धक्याने (१)
शिक्षणाचे वाजले तीनतेरा
व्यापारी लुटती खोर्याने
मदतीचे गाजर खाऊन
पोट हे भरले प्रेमाने
अर्धमेला झाला माणूस
या वायरसच्या धक्याने (२)
किती काळजी, किती सुरक्षा
मास्क, हॅन्डगोल्ज ते नियमाने
आप्त असो वा असो मित्रगण
जळु न शकला संस्काराने
अर्धमेला झाला माणूस
या वायरसच्या धक्याने (३)