अर्धांगिनी
अर्धांगिनी
जीवनात स्वप्न होतील पूर्ण
त्यासाठी गरजेची आहे पत्नी
घराला घरपण पूर्ण करते
सुखदुःखाची सोबती अर्धांगिनी
तिच्या आगमनाने माझ्या
संसाराला मिळाला सहारा
माझी अर्धांगिनी नाही तर
ती माझ्या पतंगाचा दोरा
तिच्यासोबत जुळले सुत
सार्थक झाले जीवनी
प्रत्येक क्षणात साथ देते
ती माझी धर्मपत्नी
ती माझी अर्धांगिनी
मी उडतो उंच आकाशात
तिच्या अनमोल सहकार्यामुळे
मला फुटले आशेचे पंख नवे
तिच्या कौटुंबिक आधारामुळे
लेकरासह घर सांभाळते
किती ही त्रास सोसुनी
दु:खातही सदा हसरा ठेवी
ती माझी मनमोहिनी
ती माझी अर्धांगिनी
माझ्या संसाराचा हा गाडा
तिच्याविना चालविणे अशक्य
सुखदुःखात तिची सदा साथ
म्हणून होतेय अशक्य ते शक्य
परघराची लाडकी लेक
मानते मला ती धनी
इज्जतीची पर्वा करते
ती माझी पाणिनी
ती माझी अर्धांगिनी
