STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

2  

Manisha Wandhare

Others

अपूर्ण स्वप्ने ...

अपूर्ण स्वप्ने ...

1 min
41

या कोमल तनुवरी स्पर्श घसरतो असा,

ओला दव प्रेमाचा निखळतो जसा ...

चांदण हळूवार चमकणार आकाशी ,

रंग रातीचा डोळ्यात दाटतो जसा ...

फुलाच्या गर्भात मकरंद लपलाय ,

भुंगा गोडवा प्रितीत चाखतो जसा ...

येतो अचानक प्रवासी कुठला बागेत,

पडता नजर फुलावरं खुडतो जसा ...

आयुष्याची अपूर्ण स्वप्ने त्या फांदीवरी,

ती आठव फुलतांना वृक्ष रडतो जसा...

हरवते वाट सापडते पुन्हा जगण्याची,

जीवन रेतीच्या पाऊलखुणांचा वसा जसा...


Rate this content
Log in