अपुले घर
अपुले घर
1 min
132
अपुले घर असावे छान
करावे आपण गरीबांना दान
चार चौघांना आपले मानावे
आपुलकीचे नाते असावे
पै पाहुण्यांची सोय व्हावी
आपल्या गैरसोयीचा करावी चावी
शेजाऱ्यापाजाऱ्यांचा करावा आदर
गोरगरिबांना द्यावी प्रेमाची झालर
आपला चांगुलपणा हा अनमोल दागिना
मिळेल त्यांना जे करतात साधना
द्या क्षमा शांती हे गुण जोपासावेत
प्रत्येकाने आपल्या परी प्रयत्न करावेत
