STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

अपेक्षा...

अपेक्षा...

1 min
243

केवढ्या ह्या अपेक्षा असतात त्या छोट्या जीवाकडून .....

मुलगी ते स्त्री ह्या प्रवासाकडून .....

जन्म झाला कि काही जण नाक मुरडतात ....

मुलगी झाली म्हुणून दुःख करतात .....

बारश्याला सुद्धा गोड पेढ्याला बाजूला सारून जिलेबी वाढतात ....

मुलगी थोडी मोठी झाली कि खेळणं बागडणं बंद करतात ....

शोभत नाही मुली ची जात आहे असे म्हणतात ....

सात च्या आत घरात वेळ आहे ठरवलेली

न होवो उशीर ह्यावी खबरदारी ...

शिकून घे आताच घरकाम जायला हवे तुला सासरी....

नेहमी म्हटले जाते परक्याचे धन आहेस तू मुलगी ....

एकदा झाले लग्न कि ओळखच बदलते ....

जन्माच्या नावाची ओळख पुसून जाते ....

नवीन ओळखी सह नवा साज चढवाव लागतो ...

अनोळखी व्यक्तींना आपलंस करावा लागत ...

आपलं मन कुठेतरी दूर ठेवावं लागत ...

नव्या घरात रुळाव लागत ....

लग्नाना ला काही दिवस होताच गुड न्यु कधी विचारलं जात ..

अपेक्षा ठेवल्या जातात खूप तिच्याकडून....

तिच्या मात्र मनाचा नसतो विचार कोणाचकडून



Rate this content
Log in