अनुभव...
अनुभव...
अशीच एकदा आईबरोबर गेले होते मामाच्या घरी....
भेट देण्यासाठी कोणी बाळंत झाले होते शेजारी...
आई बरोबर पायरी चढले मी हॉस्पिटलची ...
आईने सांगितले इथेच झाली तुझी ओळख जगाशी...
आत गेल्यावर आईने बोट करून दाखवलं तो वार्ड ...
जिथे माझी असायची रडारड फार...
मग आम्ही शिरलो भेट देण्यासाठी ..
आई घेत होती ख्यालीखुशाली...
माझी मात्र नजर खिळली होती त्या वार्ड पाशी..
न जाणो एक आपलेपणा वाटत होता....
तिथुन निघताना त्या वार्डला माझ्या नजरेतून साठवला ....
अदभुत असा अनुभव मी तिथे अनुभवला...
