STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

3  

Sakharam Aachrekar

Others

अंतर वाढू लागले

अंतर वाढू लागले

1 min
169

रंग रेशमी गुलबक्षीचे, आज अचानक सरू लागले

श्वासातील त्या क्षीण तनाच्या, अंतर वाढू लागले

शोधतोय तो त्या सावलीला, त्याच जुन्या सागरतीरी

त्याच त्यांच्या मार्गी उभा का काट्यांच्या द्रोणागिरी

सूर्यास्त होता शांत तिचे भासही विरू लागले

श्वासातील त्या क्षीण तनाच्या, अंतर वाढू लागले

अनोळखी होऊन मन त्याचे, अंतराळी धावत होते

तिला पाहण्या अंतिम एकदा, थोडा वेळ मागत होते

हलकेच तयाच्या डोळ्यापुढे अंधार दाटू लागले

श्वासातील त्या क्षीण तनाच्या, अंतर वाढू लागले

होऊन हतबल सार्‍या अंती, चिता त्याची पेटली

एक भेट तिची शेवटची, त्याला नाहीच भेटली

सरण त्याचे गीत प्रियेचे, अंतिम गाऊ लागले

श्वासातील त्या क्षीण तनाच्या, अंतर वाढू लागले

Rate this content
Log in