आज हे देश प्रेम हवे !
आज हे देश प्रेम हवे !
1 min
220
देशस्तुती ज्ञानगाणी, संतरं खाऊन गेली !
ज्ञान ते मात्रं, विदेशी बंदरं पाहून गेली !
होत होती ना लढाई , रक्त वाहूनी, विरांचे?
रक्त कष्टाच्या नद्या सीकंदरं नाहून गेली.
आज आता आण घेतो, शोध घेऊ मातृभूमे-
लोपलेल्या ज्ञानराशी, मंतरं वाहून गेली.
ग्रंथ वाचूनी सली ठेऊन, कुठे फेकली ती.
मंत्र आली, वापराची तंतरं राहून गेली.
आंधळं पाही इथे वाही दुधाच्या लाख गंगा.
आपल्या सायी दुधाच्या, मांजरं चाहून गेली
