अनोखी भाऊबीज
अनोखी भाऊबीज
1 min
11.4K
लागली होती धरणीला
आकाशाच्या भेटीची ओढ
होत हे कुणाला तरी
पडलेले अद्भुत कोडं
पडला पाऊस पहिला
दरवळला मातीचा वास
आकाश भरवत होता तिला
आपल्या घासातला घास
वारा जायचा जोरात
वाहत उंच दूर दूर
आकाशाच्या कानात सांगत
तो होता गुजगोष्टी भरपूर
समजू लागली धरणीला
हळुहळु नभाची भाषा
कधीतरी भेटेल मनात
तिच्या हीच वेडी आशा
निघाला तो भेटायला जरी
अंतर होते चालायचे भरपुर
पाठीवर होता मोठ्यामोठाल्या
तारांचा भलामोठा भार
कडाडत होती आकाशात
जोरजोरात लांबलचक वीज
तो दिवस होता पिढ्यानपिढ्या
साजरी केली म्हणुनी "भाऊबीज"
