अनोखे नाते...
अनोखे नाते...
.. एक वेगळेच आहे
हे बेजोड नाते
जणु असाव एखादं डोंगरावरील
गतिमान पवनचक्कीचे पाते...
...घट्ट नातं असुनहि प्रत्येक जण
आवडीनिवडिच्या बाबतीत स्वतंत्र आहे...
दुरुनच ओळखतात मनाची घालमेल
असे देवच जाणो कोणते यांच्याकडे होकायंत्र आहे....
...या जगातल्या कोणत्याही ऊन
वारा यात यांना रोखण्याची ताकत नाहि...
कितीहि संकट आले तरी ते
परिस्थिती समोर वाकत नाहि....
..... मुर्ती बनण्यासाठी महत्वाचा
दगडावर बसणारे घाव असते
कधीहि त्याच्या मद्तीला धावणारे
तिच्या अंर्तमन साफ असते
त्यात कोणताही कपटिचा डाव नसते....
....जवळ असुनहि त्यांच्यात
पुरेसे असे अंतर आहे
जिवनरेखा त्यांची कधी वक्र
तर कधी समांतर आहे...
...एक पण दिवस हे
एकमेकांशिवाय राहु शकत नाही
नी एकमेकांना दु:खकष्टात
असलेले कधीच पाहु शकत नाहि...
