अनंत...!
अनंत...!
अनंत शब्दाचा अर्थ मजला
ब्रह्मान्ड शब्दाची व्याप्ती पाहून कळला
अनंतास नाही काही सीमा
जीव माझा ब्रह्मांडी रमला...
एक एक अनेक पाहता
आनंतास मी घालीन म्हणतो वळसा
चढविन म्हणतो अवकाशी मी
वेगळाच झेंडा विक्रमाच्या कळसा...
फिरतो अथांग अवकाशी
पंख मनाचे भले मोठे विस्पारुनी
तोही अचंबित होतो नभी
मला असा उडताना पाहुनी...
मध्येच थांबवून पुसतो मजला
काय करायचे आहे फिरून तुजला
अरे अखंडित हा पसारा नटला
शोध अन अंतही मलाही नाही लागला...!
नमस्कारुनी त्या विधात्याला मग
वळलो मी माघारी दुज्या कुशीवर
कळले मजला ब्रह्मान्ड चांगले
पहाटे पहाटे बाबा जाग आल्यावर....!
ब्रह्मान्डच ते ब्रह्मान्डच असणार
त्याचा अंत कधी लागेल का...?
तहान माझी कधीतरी ही
या ब्रह्मांडी कोणीतरी देवा शमविल का...?
हसला मिश्किल अन म्हणाला मज
काळजी नको करू येईन पुन्हा स्वप्नात
असु देत तुझी रे तहान अशीच
अंतरातल्या तुझ्या बासनात...!
