अनमोल नीती
अनमोल नीती
1 min
376
अनमोल जन्म दिला तू भगवंता
आज तुलाच विसरली जनता
सोडवा हा आता गुंता
हे दयाधना कृपावंता!!
एक एक क्षण किती मोलाचा
लाभ घेता तू प्रभूनामाचा
विकास करण्या बुद्धीचा
मार्ग धर संंतसंंगतीचा!!
मुठभर पै पैशासाठी
विकू नका ईमान नीती
नको लागू स्वार्थाच्या पाठी
सत्कर्म बांधा बा गाठी!!
आहे त्याच्यात समाधान मानावे
प्रत्येक क्षण सुखाने जगावे
माणूस म्हणून सदैव राहावेे
सगळयांना आपले समजावे.!!
