अनमोल जन्म
अनमोल जन्म
1 min
303
अनमोल जन्म तू दिला भगवंता,
आज तुलाच विसरली जनता,
सोडवा हा आता गुंता,
हे दयाघना क्रपावंता.
एक एक क्षण किती मोलाचा,
लाभ घेता तू प्रभूनामाचा,
विकास करणे या बुद्धीचा,
मार्ग धर्म सतसंगतीचा.
मुठभर पै पैशासाठी,
विकू नका ईमान नीती,
नका लागू स्वार्थाच्या पाठी,
सत्कर्म बांधा बा गाठी.
आहे त्याच्यात समाधान मानावे,
प्रत्येक क्षण सुखाने जगावे,
माणूस म्हणून सदैव रहावे,
सगळयांना आपले समजावे.
