अंकुर
अंकुर
1 min
249
बंद मुठठी आवळुन आईच्या उदरात होते
बंद डोळ्याने खुप स्वप्ने बघत होती
आईचे हृदय जगण्याचा आभास करून देत होते
तिच्या श्वासातून मातीचा सुगंध घेत होते
आईचा आनंद तिचे हसने जाणवत होते
बाहेरील सृष्टी बघण्याची वाट मी पहात होते
पण अचानक काय झाले मला कळलेच नव्हते
आईचे हसने बंद झाले होते
बाबा तिची समजूत काढत होते
प्रकाशाची रेघ कमी होताना जाणवत होती
क्षणात अंधार झाला आणि सर्व शांत झाले
हे जग बघायच्या आधीच घात केला माझा
डोळे ऊघडण्या आधीच अंत झाला माझा
