अंगवळणी
अंगवळणी
1 min
11.8K
अंगवळणी न कळत
काही संस्कार बिंबतात
थेंबे थेंबे तळे साचे
मनावर पक्के कोरतात
आता हाती आलेला
तो एक पैसा
साठवावा नीट नेटका
गरजे पुरता खर्चावा
आता त्याचे मूल्य
असेल नगण्य ठायी
अडचणीत येताच तुम्ही
लक्ष जाते त्यावर
सुखावता क्षणभर मग
धन्यवाद आई-बाबांना
न कळत लावलेया
बचतीच्या सवयी साठी
काळाची गरज ओळखून
करा बचत पैशाची
नका धावू आमिषापाठी
'आत्मनिर्भर' नागरीक बनन्या
