अंगण
अंगण
1 min
185
रात रात
कृष्ण रात
चांद रात
नक्षत्रात
रौप्य किरण
फुलावरी
झेपतात
बहरतात
कळ्या कळ्या
फुल फुलें
उमलतात
उसळतात
फुला वरी
सोन पाखरे
नाचतात
मधूकोशात
गन्ध सुगन्ध
लुटतात
स्रवतात
पाझरतात
दवबिंदु
शुक्ल इंदु
अंगणात
न्हातात
रात राणी
गात गाणी
मधु वाणी
चिंबतात
दिव्य ज्योत
अगणित
अनादी त
अनंतात
