अंगाई
अंगाई
1 min
31
चंदा करी गाई गाई, जोजवते बाळा आई..
पाडस गऊच्या कुशीत, गवताच्या मऊ उशीत..
कृष्णबाळा, यशोदामाई लडिवाळे गाई अंगाई..
चांदण्या त्या नभातल्या लुकलुक करत झोपल्या..
पापण्या त्या चिमुकल्या, झोपेने पाहा जड झाल्या..
स्वप्ननगरीची राणी येईल, सोनुल्यास परीदेशी नेईल!
