अनेक रूपातील सुपरमॉम
अनेक रूपातील सुपरमॉम
जशी सावली आपली साथ,
कधीच सोडत नाही..
तशी जीवनात शेवटपर्यंत साथ देणारी, सावलीरुपी मैत्रीण म्हणजे आई...
नऊ महिने स्वतः कळ शोषत,
गर्भात स्वर्ग दाखवणारी..
स्वर्गरुपी मैत्रीण म्हणजे आई...
चेहरा ओळखुन काही न सांगताच,
हृदयाचा संदेश जाणणारी..
हृदयरुपी मैत्रीण म्हणजे आई...
अभ्यासोबत संस्काराचे धडे गिरवत,
संकटात खंबीर राहायला शिकवणारी..
गुरुरुपी मैत्रीण म्हणजे आई...
तापात रात्रभर कपाळा वरच्या पट्ट्या बदलत,
स्वतःच्या डोळ्याची वात तेवत ठेवणारी..
डॉक्टररुपी मैत्रीण म्हणजे आई...
स्वतःला बरं नसताना देखील ऊठुन,
सगळ्यांच्या काळजीपोटी झटणारी..
आधारस्तंभरुपी मैत्रीण म्हणजे आई....
लाखो चुका झाल्यानंतर,
सुद्धा पावलोपावली माफ करणारी..
देवरुपी मैत्रीण म्हणजे आई...
