अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
असे कसे हो ज्ञानी आम्ही
मानतो भूत, प्रेत, बाधा
विज्ञानाच्या युगातदेखील
अंगी बाळगतो अंधश्रद्धा.......
कधी होऊ आपण सारे
विचारणे खरे सुज्ञ
घरात आहे अशांतता म्हणून
करतो हवन आणि यज्ञ.........
अंधश्रद्धेने ग्रासलेले आपण
गोरगरीबांना उपाशी ठेवतो
देवाचे नाव घेऊन लुटणाऱ्या
पाखंडी बाबांचे घर भरतो......
देव काही मागतो का हो
मुक्या जनावरांचे बळी देतो
खरंच का आपल्या मूर्खपणाला
दगडाचा देव खूष होतो.......
देवाकडे इच्छा करतो व्यक्त
देणगी टाकतो गल्ल्यात
आपल्या अंधश्रद्धेमुळे फुकटचा
पैसा जातो बुवा भटजींच्या खिशात......
अज्ञान, अंधश्रद्धा पसरलीये
आपल्याच भारत देशात
म्हणून ढोंगी पाखंडी लोक
लुटतात वेगवेगळ्या वेशात........
