अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
1 min
242
श्रद्धेची अंधश्रद्धा झाली
विवेकबुद्धी वाया गेली
राहिली ना चाड मानवदेही
समाजात माजली दूही।
अंगारे-धुपारे मंत्रोच्चार
नवस बळी हे उपचार
बुद्धिहीन वटवट सारी
करती मने विषारी।
धुंडाळी पाप-पुण्याची झोळी
स्वर्ग-नरकाच्या कल्पनेने देह जाळी
मोक्षाची व्यर्थ धडपड सारी
अवघे माणुसपण विटाळी।
