अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
1 min
212
माहिती आहे मला
श्रद्धा असतेच भोळी
ज्यावेळेस होते अंध
त्यावेळेस होते तिची होळी
दिसतात हल्ली सर्वत्र मला
कफनीतील भोंदू बाबा
फसतात सारे यांच्या मोहास
टेकवतात आपला माथा
निराशेच्या पाशात अडकलेले जीव
लागतात सुखाच्या शोधात
दुःखाने ग्रासलेली मंडळी सारी
अडकतात बाबांच्या जाळ्यात
कलियुगातील भोंदूगिरीने
चालवलाय भावनांचा खेळ
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पायी
पैश्याचा हि राहिला नाही मेळ
