STORYMIRROR

Umakant Kale

Others

4  

Umakant Kale

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
298

नको जाऊन भावना आहारी

कुठे अंधश्रद्धाने भले होई

कापून कोंबड्या येथे रे

कोणता देव प्रसन्न होई...


नाही पाहिला कोणी रे देव ?

उगाच का गप्पा हानी !

म्हणे सांगून गेला मला देव !

सांग ! "देव " भला कुणाला देई हानी !


राख धूप अंगाऱ्याने येथे

कुठे कोणता आजार बरा झाला ?

मनाच्या अशा कल्पना तू रे

जो-तो मग नाहक बळी झाला..


एकाच्या सुखासाठी येथे

देव कसा बदलणार ?

नाही वेड्या कर्म तुझे

कसा मग देव पावणार ?


मान्य आहे मला तुझी श्रद्धा

डोळसपणे पणे कर भक्ती..

काय चुक आणि काय बरोबर

ओळखून सार्थक होईल भक्ती...


श्रद्धा जीवन घडवून जाई

अंधश्रद्धा घात करून पाही..

सावर तू मानवा ! मग तुला !

देव ही येथे भेटून पाही...


Rate this content
Log in