STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
372

आयुष्याच्या चौकोनाला असावी

श्रद्धेची झालर

पण होऊ नये अंध 

अंधश्रद्धेच्या सोंगा पुढे


घ्यावा प्रसंगा गणिक घटनांचा मागोवा

अंधश्रद्धेच्या पावलांचा

जीवंत मेंदूला पेटवून

स्वयं प्रज्ञेच्या प्रकाशात

माणसाचा इतिहास मांडणाऱ्या

सर्व अग्रणी साहित्यिकांनी


उलगडावे कोड्याचे अर्थ

संदर्भ लावूनि सत्याचा

अन् सांगावा त्यातला कार्यकारण

सोक्षमोक्ष


लिहावा प्रकाशाचा ग्रंथ

अंधश्रद्धा खोडत खोडत पानोपानी

आपल्या माणसासाठी

निकोप समाजासाठी 

खऱ्या श्रद्धेसाठी


Rate this content
Log in