STORYMIRROR

Sarika Musale

Others

3  

Sarika Musale

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
276

कशाला रे हवी अंधश्रद्धा 

जग चालले एकविसाव्या शतका

दगडाला शेंदूराचा लेप लावता 

त्याला नवस कशाला रे करता


हरवली आहे मनातली शक्ती 

करु नको रे खोटी भक्ती

उपास,तापास अन् नवसाने तुमच्या 

होईल का कसली प्राप्ती 


काळादोरा अन् लिंबाने मिटली का रे बाधा

आहे हा खेळ मनाचा विचार करा रे साधा

आडव्या जाणार्या मांजरेमुळे गोंधळून का रे जाता

येण्या-जाण्याचा मार्ग तिचा संबंध काय कामाचा


भूत-प्रेत,जादूटोणा पळवतो का कुठे भोंदूबाबा

प्रसंगी चिमुकल्याचा जीव घेता कुठे गेली मानवता

बदला रे तुमची मानसिकता कहरच झाला आता

साक्षतेचा धडा गिरवा आधार घ्या विज्ञानाचा


Rate this content
Log in