अंधश्रद्धा - विरोध
अंधश्रद्धा - विरोध
1 min
289
तो उभा होता ठामपणे
श्रद्धा - अंधश्रद्धेच्या मध्याला
विकत काही नव्हताच कुणाला
काय करायचंय आपल्याला
होडी त्याची होती मोठी
तयार ना कुणी बसायला
चिकटून सारे परंपरेला
ठेविती कानावर हाताला
आयुष्य व्हावे सुखे साऱ्यांचे
बळी त्यास्तव का दुसऱ्याचा
विसरुनी कर्माना आपुल्या
का दुष्टावा तिसऱ्याचा
हवे श्रद्धेचे अधिष्ठान प्रयत्ना
तेव्हाच मिळते यश कर्माना
अंधश्रद्धा कवळी क्षणभंगूर यशाला
जाणा तयातील लपल्या अर्थाला
सांगत राहिला वल्हावित होडी
साहू नका हे उघड्या डोळी
निघून तो दूर गेला शरीराने
होडी एकुटी ती , भरेल कधी कोण जाणे.
