अंधश्रद्धा निर्मूलन
अंधश्रद्धा निर्मूलन
म्हणे सर्व प्राणिमात्रांत मी सर्वात बुद्धिमान
मग का बरं ठेवतोस अक्कल तुझी गहाण
श्रद्धा अन अंधश्रद्धा यातील पुसट रेषा जाण
तरच माणसा स्वतःला माणूस म्हणून तू मान
स्वतःहून न हलणाऱ्या दगडास मानतोस देव
तुझे नशीब तुझ्याच मनगटात हे ध्यानात मात्र ठेव
गंडेदोरे, अंगारे धुपारे कधीही येत नाहीत कामी
बुवांना मात्र श्रीमंत होण्याची संधी देतोस नामी
भूतप्रेत, जादूटोणा प्रकार आहेत सगळे खोटे
तुझ्याच पैशावर बुवा-बाबा झालेत आज मोठे
उपास तापास ,नवस करून होत नाहीत मुले
नरबळीने कशी फुलतील संसार वेलीवर फुले
निर्मळ श्रद्धेला नको लावू तू अंधश्रद्धेची किनार
फक्त तुझ्याच कष्टाने होतील संकटे तुझी पार
उपटून अंधश्रद्धेची मुळे, धर विज्ञानाची कास
अंधश्रद्धा निर्मूलनातच आहे तुझा खरा विकास
