STORYMIRROR

vinod mohabe

Others

3  

vinod mohabe

Others

अंधश्रद्धा निर्मुलन?

अंधश्रद्धा निर्मुलन?

1 min
290

दगडापासून कधी, 

कोणी जन्म घेत असते का?

दगडाला मुख नसून, 

एवढं कोणी दूध पिऊ शकते का?   


देव असा होऊन गेला, 

त्याला कोणीतरी पाहिले का?   

डोक्यावर चंद्र ठेवूनी, 

जटांत गंगा कोणीतरी ठेवतांनी पाहिले का?


क्रोध आला कधी, 

तांडव कोणी करते का?

गळ्यात साप ठेवूनी, 

कैलास पर्वतावर कोणी एकटा राहू शकते का?   


नंदी बैलावर बसून, 

वरातीत कोणी जाऊ शकते का?   

स्वतःले कोडे कोणी मारुन, 

भक्तांना कोडे मारायला कोणी सांगेल का? 


अंगात कधी काळी माय येते का, 

बाबाच्या झाडीतून कधीतरी जाते का? 

देवाच्या नावे तुले लुटते, 

भोळ्या माणसा हे तुले कधीतरी समजेल का?      


Rate this content
Log in