STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

अंद्धाश्रद्धा...श्रद्धा...!

अंद्धाश्रद्धा...श्रद्धा...!

1 min
238

गोष्ट घडली साधी सुधी

एक पोर भेटल रस्त्यामधी

असेही घडते कधी कधी

काहीतरी गवसते आधी मधी...

श्रद्धा कि अंधश्रद्धा

मी काही जाणत नाही

पण या द्वंद्वात काहीतरी

घडल्या शिवाय रहात नाही...

रस्त्यात एक कुमारवयीन

मुलगा मला भेटला

त्याने दहा रुपयांसाठी

सहजच हात पुढे केला....

दहा रुपये हातात पडता

त्याने नोट गायब केली

आणि साईबाबांच्या नावाने

हातावर माझ्या एक ताईत ठेवली...

नवल वाटले मला

त्या कुमारवयीन मुलाचे

दाखवून दिले त्याने

मूळ आपल्या देशाचे...

काहीही जीवनात घडू शकते

हे मला शिकायला मिळाले

अंधश्रद्धेचे श्रद्धेत रूपांतर

कस होते हे जाणता आले...

आजही तो ताईत माझ्याकडे

तसाच ठेवलेला आहे

जो मला श्रद्धा काय असते

ते तो मला दाखवून देत आहे...

नवल वाटले त्याच्या चलाखीचे

त्याहून त्याच्या बाबांवरच्या श्रद्धेचे

त्यांने त्याचे स्थान जाता जाता

पक्के केले माझ्या मनात कायमचे...

दाखवून दिले त्याने

या देशात काहीही घडू शकते

बोलघेवड्या माणसाला

या जगात काही कमी पडत नसते....

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये

हर एक दिन एक नया फँडा चाहिये

जरी कोणामुळे कोणाचे अडत नाही

तरी श्रद्धे विना जगण्यात काही अर्थ नाही

श्रद्धा अंधश्रद्धे पलीकडचे विश्वासाचे जग

वास्तवात अनुभवास आल्या वाचून रहात नाही...!


Rate this content
Log in