अमृतमहोत्सवी शुभेच्छा
अमृतमहोत्सवी शुभेच्छा
1 min
362
अमृतकलश घेऊनी
अमृतमहोत्सव आला
स्वरधारांनी चिंब भिजूनी
स्वरमाधुर्यात रमला
जीवनपथी सार्थ साथ
अरुणाताईंची
हसतमुखाने पेलली
धुरा संसाराची
दीर्घ आयुःआरोग्यासह
लाभो समाधान
स्वरदेवतेच्या कृपेने
मान - सन्मान
जीवनपथी सदाच बरसो
श्रावण प्रेमाचा
सुखस्मृतींचा आठव बहरो
अमृतमहोत्सवाचा
