अमर राहून मरणात
अमर राहून मरणात
1 min
238
प्रेमाच्या सावलीत येता
मन मनासी हसले
धडपडले जीव उन्हात
शब्द थेंबाने भिजले
दिलासा घेतं उल्हासले फार
एकवटून स्वसमर झाले
प्रकाश घेऊन अंधाऱ्या रात्री
एकतेत उतरली क्रांती
दम भरून आपले रूप
अस्तित्वाचा मूळ हक्कासीं
उभे ठाकले नवं दुनियेत
आंकाक्षेच्या नावेत बसून
पाण्याचे गुणगान करत
रस भरतो हिरव्या देठात
खाऊन खुलवते अंकुर
फळे गोमटी गोडीची
उगवते जगण्याचे मर्म
कर्मात आनंदी होऊन
फिरत शोधतो क्षितिजात
अमर राहून मरणात
