अलविदा खय्याम.....!
अलविदा खय्याम.....!
1 min
316
चार पिढ्यांचे तृप्त करोनी सुरावटीने कान
यमदुताच्या मांडीवरती विसावली ही मान
‘उमर’ लाभली खय्यामांच्या हरेक गीता दीर्घ
विविधरंगी रचना ऐकत रसिक अनुभवी स्वर्ग
कीर्ती ठेवून मूर्ती गेली उमराव जान रडली
परस्परांच्या गळ्यात वाद्ये मूक होऊनी पडली
देवदूत हा येऊन गेला ठेवून गेला ठेवा
स्वर्गामध्ये रुजू करील तो नक्की संगीत सेवा
