अक्षयतृतिया शुभचिंतन
अक्षयतृतिया शुभचिंतन
1 min
11.9K
अक्षयतृतियेला सजवा थाळी
जेवायला येउ दे पेंद्या, वनमाळी
ब्राम्हणाला द्या धातुचे दान
पुर्वजांचा साधला जाइल सन्मान
गरिबांना द्या धान्य पाणी
सरस्वती सांभाळेल तुमची वाणी
गाइला घाला हिरवा चारा
दुधाच्या वाहतील धारा
साठवण होउ दे दुध दहि लोणी
सुख समाधानाची भरलेली गोणी
देणार्याचे हजारो राहु दे हात
पीठ मिठ राहु दे घराघरात
कधी न पडावा पीठामीठाचा खंड
सगळीकडे वाहु दे श्रीमंतीचा झरा अखंड ||
