अक्षरांचा कागद
अक्षरांचा कागद
1 min
153
पांढरा शुभ्र कागदावर उमटत जातात काळी ,निळी लाल ,हिरवी ,अक्षरे ...
उमटलेली अक्षरे देतात कधी आनंद , दुःख, वेदना, हुरहूर ...
कधी अर्थाचा अनर्थ करतात , तर कधी सहजपणे मन उलगडत जातात ...
शाई म्हणजे कागदाचा आत्माच जणू !!
उमटलेलं प्रत्येक अक्षर कागदाला अर्थ प्राप्त करून देतो...
अर्थ सफल झाला तर कागदाचा तुकडा अन् तुकडा जपला जातो ...
अन्यथा केराच्या टोपलीत टाकला जातो...
