अक्षर अक्षर जमवून
अक्षर अक्षर जमवून
1 min
173
अक्षर, अक्षर जमवून
शब्द, शब्द बनवून
लिहावी चांगली कविता
सुचेल चांगले, लिहिता, लिहिता//1//
लिहणे नसावे वाईट
लिहिणे नसावे उद्धट,
नसावे काही रागीट
येऊ नये वाचताना विट//2//
आपले शब्दांचे भांडार
सरस्वतीचे सदा उघडे द्वार
करावा चांगला व्यवहार
देऊ नये शब्दांचा मार//3//
आपली मते लिहिण्यात मांडावी
विचारसरणी जगाला कळावी
जाणावे आपल्या शब्दांचे मोल
रुजावे सगळ्यांच्या मनात खोल//4//
