अजुनही यौवनात मी
अजुनही यौवनात मी
अजुनही यौवनात मी*
सुख दु:खाचे आपण
दोघेही सगे सोबती,
संसारात गेलो रमुनी
घेत आपला हात हाती.
झेलत आलो चढ उतार
जीवनाच्या रे खेळाचे,
संगतीनेच जुळायचे
सुत आपल्या मेळाचे.
साज श्रुंगार करण्या
नव्हती मजला उसंत,
प्रेमळ स्पर्शाने तुझ्या
ना उरायची कसली खंत.
करुन तू प्रेम वर्षाव
राखलेस सदैव आनंदी,
होऊन मी प्रेम पाखरु
उडायचे रे स्वछंदी.
सरत चालले तारुण्य
लागली कळा वार्धक्याची
संसाराचा गाडा ओढता
जाणीव ना उरली कशाची.
झालास माझा तू आधार
जीवनाची देऊन हमी,
गेले तारुण्य तरी म्हणतोस
अजुनही यौवनात मी.
-------------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©
मु.पो.गडद, ता.खेड, जि.पुणे
