STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

ऐका ऐका भक्तगणांनो

ऐका ऐका भक्तगणांनो

1 min
303

आलो आलो भक्तगणा

आशिर्वच तुम्हां देतो

सकलांच्या रे कल्याणा

चार गोष्टी मी सांगतो  (1)


उत्सव माझा सुरु केला

लोकमान्य टिळकांनी 

इच्छा एक त्यांच्या मनी

एकत्र यावे सर्व जनांनी  (2)


शुद्ध पवित्र शांत स्वरुप

आता मात्र रंग बदलले

नाच गाणी धिंगाणाही

माझ्यापुढे करु लागले  (3)


अचकट विचकट

गाणी नका रे लावू

थिरकत्या तालावर

नका रे असे नाचू   (4)


मिरवणूकीत असावी

ढोल लेझीम पथके

कर्णकटू नाच गाणी

नकोत पिऊन धिंगाणे  (5)


 खर्च करा माझी वर्गणी

पूरग्रस्त लोकांसाठी

दुवे त्यांचे मिळतील तुम्हां

मदत करा दुःखितांसाठी (6)


साहित्याला गुण द्या
लॉग इन