ऐक सखे
ऐक सखे
1 min
471
पहाट होईल गं
ऐक सखे सुंदरी
हो तयार तू अशी
जशी तू माझी परी...
पहाट झाली, झाली
कोंबडा गं आरवला
वासुदेव आला दारी
सूर्या पूनवेला उगवला...
दाही दिशा उजळली
प्राजक्त दिशात गंधाळला
सुवास चौफेर प्राजक्ताचा
आसमंती गं दरवळला...
पक्षी घरट्यातूनी
बाहेर चार्यासाठी पडले
चिमण चारा गं पिलांसाठी
शोधाशोध करू लागले...
कळ्यांची पाकळी, पाकळी
लागेल आता छान उमलू
गुलाबाचे फूल आता
लागेल गं मस्त फुलू...
गाई गुरे घेऊन रानी
निघेल वनात गुराखी
गुराख्यांचा कृष्णसखा
आहे रातदिन पाठराखी...
माऊलीची धावपळ
आता चालू होईल
मुलाबाळांचे करण्यात
माऊली रंगून हो जाईल...
