ऐक सखे....
ऐक सखे....
1 min
285
ऐक सखे साजणी तू
पुण्याची ग कहाणी
मुंबईची तू ग राणी
आलीस माझ्या जीवनी....
पुण्याचे नाव होते पुनवडी
टुमदार गाव होते वसलेलं
वनराईच्या गर्द राईत
लोकांचे बस्तान होते बसलेलं....
ऐतिहासिक वास्तूंची ही खाण
जपून ठेवलीय मराठ्यांची शान
निसर्गातील रम्य स्थळांची
पुनवडी लावण्याची खाण.....
विद्येचे हे माहेरघर असे
नाही इथे काहीच उणे
अनेक सुधारणा झाल्या आता
नाव दिमाखात घेतात सारेजण पुणे.....
