अहंकाराची गर्विता!
अहंकाराची गर्विता!
तिजं येऊनी भरते, बरसते मनसोक्त
तोंडघाशी ही पाडीते, न काढीता रक्त
ओसंडूनी वाहतो, आनंद तो केवढा
न सामावी उरात, पसरतो सगळा
वेचायाचे काय कसले, तिजला भान
उत्साह मात्र मिरवाया, कसला मान
माझ्यासवे असे सतत, तिची चाहूल
ना अलिप्त कधीही, हिचं पाऊल
काय करू हिला, कशी मी आवरू?
अशी वधारू वेल, कशी मी सावरू?
मम जगी खेळणारं, इवलं शिंगरू
इतरत्र बागडणारं, गोंडस पाखरू
लढाया तयार, कायम सैनिकांवानी
रक्षणाची हौस, जशी की मेहेरबानी
नकळता वावरे, अशी ही सुलक्षणी
अवघड हे जाणणे, खरे प्रथम क्षणी
रचाव्यात गोष्टी, हिच्यासवे हरवेळी
तिचीच धाटणी अन तिची मधू बोली
अस्तित्व वास्तव्याची, जरी हीच वाली
आव्हानं ही सामोरी, केवळ तर्काधारी!
