अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकर
जामखेड येथील चोंडी या खेडया गावात जन्मलेल्या
शिक्षण प्रसार नसतानाही वडिलांकडून शिकलेल्या
योध्द्या होत्या त्या पराक्रमी महान होते त्यांचे शासक
साहसी व निर्णायक व्रुत्ती धनुर्धराची आगळी धमक
अहिल्याबाईंची ओळख ही मावळ प्रांताच्या राजमातेची
आश्चर्य करी मोठ मोठे राजे साहसी नि अदम्य प्रतिभेची
विधवांसाठी प्रयत्न केले कायद्यामध्ये बदल करून
बदलून परिस्थिती स्त्रियांची अधिकार त्यांना दिला मिळवून
ओतप्रोत भरलेल्या होत्या परोपकार, निष्ठा भावनेनी
करुणेची देवी ,समाजसेविका छाप पाडली या प्रतिमेनी
विकास कामे केली अनेक धार्मिक आणि तीर्थ स्थळांची
कला कौशल्यातही योगदान निर्मिती केली सुख सुविधांची
राज्यातील चोरी, लूट, हत्या यावर शिताफीने आणले अंकुश
जाचक करातून मुक्त करून शेतकऱ्यांना त्यांनी केले खुश
पुरुषातील उत्तम शिवाजी राजे तशी स्त्रियांतील उत्तम राजकर्ती
अवघ्या वयाच्या सत्तराव्या वर्षी अखेर शूर,साहसी विझली पणती
