STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाई होळकर

1 min
374

धर्माच्या ऊत्थापनात मोठे

अहिल्या होळकर यांचे स्थान

जनतेने दिधले तिजला

देवी म्हणुनी नामाभिधान


पुण्यश्लोक त्या ठरल्या जगती

पदरात आला विश्वेश्वर

स्थापित करून काशीक्षेत्री

जगती झाली ती अमर


ती होती दयावंत, पुण्यवंत

मुत्सद्देगिरीत दिली

पेशव्यासही मात

राघोबास दिधले उत्तर


मी जिंकले तर जगी

होईल वाहवा वाहवा

पण तुम्ही हरलात तर

तुमची काय गत होईल पहा


मल्हार बाबांच्या नंतर सांभाळला

रयतेचा कारभार

विहिरी पाणपोई बांधले

नदीवर घाट सुंदर


नुसतेच राज्य नाही केले

झाली रयतेची आई

शूर लढवय्यी प्रेमळ मुत्सद्दी

अशी होती अहिल्याबाई


Rate this content
Log in